top of page
  • Instagram
  • Facebook
  • X
  • LinkedIn
  • Youtube

जाहीर वचननामा

माझे नाव डॉ. देवयानी पंडित आहे. मी शिक्षणाच्या क्षेत्रात ३० वर्षांपेक्षा जास्त काम केले आहे.

आता बदल घडविण्याची वेळ आली आहे

काळ बदलत आहे,  त्यामुळे आव्हाने बदलत आहेत आणि आपल्या गरजाही. नवीन प्रश्न, नवीन आव्हाने, जुन्या पद्धती वापरून आपण नक्कीच सोडवू शकणार नाही, त्यासाठी नावीन्यपूर्ण कल्पना राबव्यावा लागतील. ह्याच विषयासंबंधी प्रशिक्षण मी आजपर्यंत  वेगवेगळ्या क्षेत्रातील दहा हजारापेक्षा जास्त व्यक्तींना दिले आहे.

वृद्धांच्या मानसिक-सामाजिक-आर्थिक समस्या.

उच्च शिक्षण पाठ्यक्रम आणि उद्योगाच्या आवश्यकतेतील अंतरामुळे सामना करण्याच्या कठीणतेसाठी उपाये काय आहेत?

सायबर गुन्हे, पाणी, स्वच्छता, रहदारी, पर्यावरण, वाढता हिंसाचार , बेशिस्त आणि बेजबाबदार वर्तन

युवा पीढी आणि महिलांच्या मानसिक-सामाजिक-आर्थिक समस्या

आपण पुणेकर सध्या खालील समस्यांनी ग्रस्त आहोत

ह्या सगळ्याचा परिणाम आपले जीवनमान ( quality of life) हे हव्या तेवढ्या उच्च दर्जाचे नाही

पुण्याच्या विकासासाठी आणि पुण्याच्या समस्या सोडवण्यासाठी जनशिक्षणआणि जन सहभाग हा सर्वात प्रभावी मार्ग आहे असे मी मानते. ह्या तत्त्वांवर आधारित माझा वचननामा खालीलप्रमाणे आहे. 

माझ्या कृती -कार्यक्रमाची योजना खालीलप्रमाणे आहे:
 

  पर्यावरण आणि अन्य भौतिक सुविधा ह्यांचा दर्जा सुधारणे.

तंत्रज्ञान शिक्षणाच्या कार्यक्रमांचे आयोजन करणे, वृद्धांसाठी आनंदी आणि आरोग्यपूर्ण जीवन प्रशिक्षण.

युवा वर्गासाठी व्यक्तिमत्त्व विकास प्रशिक्षण, employability कौशल्ये प्रशिक्षण, स्टार्ट अप संबंधी प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन.

समाजिक आणि सांस्कृतिक पर्यावरणाची गुणवत्ता सुधारणे.

शैक्षणिक संस्थांचा दर्जा वाढविणे ,उच्च शिक्षण व उद्योग ह्या दोघांनाही फायदा व्हावा म्हणून  गरजा व  अभ्यासक्रम ह्यात समन्वय साधण्यासाठी विशेष प्रयत्न.

सर्व वयोगटासाठी ,नावीन्यपूर्ण  बुद्धीच्या विविध पैलूंवर आधारित स्पर्धा , कला विषयक स्पर्धा, 

शहराचे प्रश्न सोडवण्यासाठी समस्या परिहार स्पर्धा.

महिलांसाठी विशेष नावीन्यपूर्ण उपक्रम

स्मार्ट एज्युकेशन फॉर स्मार्ट सिटी  (Smart Education for Smart City) ह्या एक नावीन्यपूर्ण प्रकल्पाची कल्पना मी मांडलेली आहे.  ह्या प्रकल्पामुळे पुणे हे शैक्षणिकदृष्ट्या  एकमेवाद्वितीय शहर म्हणून जगामध्ये ओळखले जाईल.

कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी (सीएसआर) आणि वैयक्तिक सामाजिक जबाबदारी ( PSR) ह्यांच्या समन्वयातून पुण्याचा शाश्वत विकास करणे.

bottom of page